आता ऑपरेशन कमळ राबवावं लागेल - उद्धव ठाकरे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 23
मुंबई ः शिवसेनेचा हिरक महोत्सवी (60 वा) वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांनी मुंबईत स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठाकरे गटाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि त्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. आता ऑपरेशन कमळ राबवावे लागणार अशी गर्जना उद्धवठाकरे यांनी केली. तसेच शिवसैनिक खचलेला नाही तर पेटलेला आहेअसे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या पद्धतीने देशाचं राजकारण सुरू आहे. ते पाहिल्यावर लोकांचं लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. तुम्हाला नेमके किती आमदार खासदार हवेत असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बंडखोर खासदारांवर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मतदारांची मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की एक कार्टुन आल होते. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलं. तो म्हणतो साहेब चोरी म्हणू नका. ऑपरेशन गोल्ड म्हणा.! असं चालू असेल तर आपल्याला ऑपरेशन कमळ करावे लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की हा लोकशाहीला धोका आहे. असंच सुरू राहिलं तर देश अराजकाकडे चालला आहे. मी भाकीत करत नाही. मी ज्योतिष नाही. ज्या देशात तरुणांना झुरळ म्हणत असाल तर मुलं पेटली तर तुमचं सरकार राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. या 60 वर्षात आणीबाणी आली, तो काळ भयानक होता. त्यावेळी रजनी पटेल, आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा तो शिवसेनेच्या मुळावर उठला होता. शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करा असं होतं. आज जे बोंबलत आहेत, 30 वर्ष भाजपात विलिन नाही झालो. तर काँग्रेसमध्ये कुठे विलीन होणार? असं यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai