‘नमस्ते दिवस’ निमित्त स्वच्छताकर्मींंना पीपीई कीट देऊन गौरव
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 26
नवी मुंबई ः देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या मानांकनामागे सर्वाधिक श्रेय आपल्या स्वच्छताकर्मींचे असून त्यांच्या समर्पित कामाप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी नमस्ते दिवस हे एक चांगले माध्यम आहे असे सांगत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी स्वच्छताकर्मींना दिले जाणारे सुरक्षा साधनांचे पीपीई कीट हे त्यांचे जीवन आमच्यासाठी किती महत्वाचे आहे ही भावना व्यक्त करणारे असल्याचे मत मांडले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित नमस्ते दिवसानिमित्त पीपीई कीट वितरण समारंभप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वच्छताकर्मी म्हणजे शहराच्या आरोग्याची सुरक्षा जपणारे स्वच्छता सैनिक अशा शब्दात त्यांच्या सेवाभावी कामाबद्दल अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना उपमहापौर दशरथ भगत यांनी नमस्ते दिन हा स्वच्छताकर्मींचा सन्मानदिन असल्याचे सांगत आपले स्वच्छता कर्मचारी नंबर वन असल्याचे मत व्यक्त केले. शहर आणि शरीर दोन्ही महत्वाचे असून शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छताकर्मींच्या कामाचा अभिमान वाटतो असे सांगताना उपमहापौरांनी आपले कर्मचारी आपल्या शहराची काळजी तर घेतातच मात्र आकस्मिक गरज भासल्यास इतर शहरांमध्येही मदतकार्यासाठी धावून जातात ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वच्छतेतून शहराचे आरोग्य जपण्यासाठी दररोज कार्यरत असणारे आपले स्वच्छतामित्र व सफाईमित्र आपत्कालीन स्थितीत युध्दपातळीवर मदतकार्यासाठी कार्यरत असतात, अगदी गरजेच्या वेळी इतर शहरांमध्येही जाऊन आपली सेवा बजावतात ही प्रशंसनीय गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक होते ते तुमच्यामुळेच अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. यापुढील काळात यांत्रिकी स्वच्छता अधिक सक्षम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मलनि:स्सारण विभागातील 10 सफाईमित्र आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या 10 परिसर सखी यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साधनांचे पीपीई कीट महापौर सुजाता पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. नमस्ते दिनानिमित्त महापालिकेच्या 26 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींकरिता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai