आकांक्षी शौचालयांचे लोकार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 19
पनवेल ः महापालिकेमार्फत विविध प्रभागात बांधण्यात आलेल्या आकांक्षी दर्जाच्या शौचालयांचे लोकार्पण करुन ते नागरिकांच्या सेवेत सज्ज झाले आहेत. खांदेश्वर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल अशा विविध नोडमध्ये ही शौचालये उभारण्यात आली आहेत. विविध मान्यवरांच्या हस्ते सदर शौचालयांचे उद्धाटन करण्यात आले.
आकांक्षी स्वच्छतागृह ही आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित, दिव्यांग-अनुकूल आणि नागरिक-केंद्रित सार्वजनिक स्वच्छतागृहांची संकल्पना आहे. या स्वच्छतागृहांमध्ये केवळ मूलभूत सुविधा नसून उच्च दर्जाच्या स्वच्छता, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक सुविधांचा समावेश केला जातो. पनवेल महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून या उपक्रमामुळे नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.
खांदेश्वर पार्किंग, खांदा कॉलनी तसेच खांदेश्वर गार्डन, खांदा कॉलनी या ठिकाणच्या शौचालयांचे लोकार्पण पनवेल विधानसभेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कळंबोली मधील मिरची हॉटेल शेजारी बांधण्यात आलेल्या आकांक्षी दर्जाच्या शौचालयांचे लोकार्पण उप महापौर प्रमिलाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळ्याकरीता महापालिका नगरसेविका दमयंती भोईर, नगरसेविका मनाली ठाकूर, नगरसेविका सरस्वती काथारा, नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेवक शशीकांत शेळके, नगरसेविका दमयंती भोईर तसेच समाजसेवक रविशेठ पाटील उपस्थित होते. कामोठेमध्ये मानसरोवर रेल्वे स्टेशन पार्किंग या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आकांक्षी दर्जाच्या शौचालयांचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवीन पनवेल मधील शहीद तुषार चव्हाण गार्डन या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आकांक्षी दर्जाच्या शौचालयांचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेच्या सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai