शितपेयात मद्य मिसळून तरुणीवर अत्याचार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 22
आरोपी तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरु
नवी मुंबई : सीवूड्स येथे राहण़ाऱ्या तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणीला लॉजवर नेऊन तिच्या शितपेयात मद्य मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नेरुळ परिसरात उघडकीस आली आहे. रेहान अन्सारी असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव असून नेरुळ पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपी तरुणाच्या भावाने पीडित तरुणीला धमकावल्याने पोलिसांनी त्याला देखील या गुह्यात सहआरोपी केले आहे.
या प्रकरणातील आरोपी रेहान अन्सारी हा सी-वुड्स येथे राहण्यास असून पीडित तरुणी विक्रोळी येथे राहण्यास आहे. या दोघांची काही महिन्यापुर्वी इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. त्यानंतर अनेक दिवस हे दोघेही इन्स्टाग्रामवर संपर्कात असताना, नेरुळ येथे दोघांमध्ये भेट देखील झाली होती. त्यानंतर 11 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास आरोपी रेहान अन्सारी याने पीडित तरुणीला नेरूळ रेल्वे स्टेशन येथे भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार पीडित तरुणी आली असताना, आरोपी रेहान अन्सारी याने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन तिला नेरूळ सेक्टर-1 मधील कोहीनूर हॉटेल (लॉज) येथे नेले. लॉजवर गेल्यानंतर पीडित तरुणी बाथरुममध्ये गेली असताना आरोपी रेहान अन्सारी याने पीडित तरुणीच्या रेड बुल या ड्रिंकमध्ये मद्य मिसळले. पीडितेने सदर ड्रिंक पिल्यानंतर ती गुंग झाली असताना, आरोपी रेहान अन्सारी याने पीडिते तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांत जाण्याचा प्रयत्न केला असता, रेहान अन्सारी याचा भाऊ अक्रम अन्सारी याने पीडितेला पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास तिला बघून घेण्याची धमकी दिली.
अखेर पीडित तरुणीने हिंमत दाखवून विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विक्रोळी पोलिसांनी आरोपी रेहान अन्सारी व अक्रम अन्सारी या दोघांविरोधात भा.न्या.सं. 2023 चे कलम 64, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा करुन सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी नेरुळ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai