एसआयआरसाठी मतदान केंद्र क्षेत्रात विशेष कॅम्प
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 32
शनिवार व रविवारी बीएलओ होणार उपलब्ध
नवी मुंबई ः ‘कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीतून वगळली जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश असणार नाही’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर सुरू आहे. या अंतर्गत 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत या कामासाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत प्रत्येक नोंदीत मतदारापर्यंत दोन प्रतींमध्ये गणनापत्र घरोघरी पोहचविण्यास सुरूवात झालेली आहे. आपल्या मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ कोण आहेत याची माहिती 150 ऐरोली आणि 151 बेलापूर करिता विशेष लिंक उपलब्ध केल्या आहेत.
सदर गणनापत्रामध्ये माहिती भरून व स्वाक्षरी करून एक प्रत मतदारांनी बीएलओ यांचेकडे परत द्यायची आहे व दुसरी प्रत बीएलओची स्वाक्षरी घेऊन पोहोच म्हणून आपल्याकडे ठेवायची आहे. हे काम राष्ट्रीय महत्वाचे असून याव्दारे योग्य मतदारांचीच नावे मतदारयादीत राहिल्याने मतदार यादी शुध्द होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यामध्ये राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
यामध्ये नागरिकांना अधिक सुलभता यावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी बीएलओ यांना एका ठराविक ठिकाणी उपस्थित ठेवून विशेष कॅम्प आयोजित करण्याचे राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्राची ठिकाणे तसेच काही विशेष कॅम्पची ठिकाणे, जेथे बीएलओ उपलब्ध असणार आहेत अशा कॅम्पच्या स्थळांची यादी 150 ऐरोली करिता हीींंीि://ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/ीहरीश//ि1इषश5उज्ञींध8/ तसेच 151 बेलापूर करिता हीींंीि://ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/ीहरीश//ि17क्षषूर्ऋीथर्गी/ या लिंकवर नागरिकांना सहज उपलब्ध असून नागरिक आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांकानुसार बीएलओ यांची त्या ठिकाणी भेट घेऊन आपली एसआयआर गणनापत्र भरणेची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात अशी माहिती 150 ऐरोली मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील व 151 बेलापूर मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांचे वतीने देण्यात आलेली आहे.
तरी नागरिकांनी दि. 25 जुलै व दि. 26 जुलै 2026 रोजी आपल्या मतदान केंद्राच्या व कॅम्पच्या ठिकाणी एसआयआर गणनापत्र भरणेच्या कार्यवाहीसाठी उपस्थित असणाऱ्या बीएलओ यांची भेट घेऊन ही प्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai