एसआयआरसाठी प्रशासनास सहकार्य करा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 17
पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
पनवेल ः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत दि. 30 जून ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत घरोघरी बूथ लेव्हल अधिकारी भेट देत आहेत. आता या कार्यक्रमाचे शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारांनी घरी आलेल्या बीएलओंना योग्य माहिती देऊन आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. घरभेटीदरम्यान बीएलओंकडून आवश्यक माहिती पडताळणी केली जात आहे, नागरिकांनी त्यांना योग्य माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे.
“घरभेटीपूर्वी नागरिकांनी ऑनलाई्न स्वतःचा तसेच कुटुंबातील सदस्यांचा मतदार यादीतील तपशील तपासून ठेवावा. बीएलओंकडून देण्यात येणारा गणना अर्ज काळजीपूर्वक भरून त्यावर स्वाक्षरी करून एक प्रत बीएलओंकडे द्यावी व दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. तसेच जन्माचा दाखला, पासपोर्ट, इ. 10 वी चे (मॅट्रिक) किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी / नियुत्तीवेतन ओळखपत्र, राज्य/स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल कार्यालय, जीवन विमा महामंडळ किंवा सरकारने 1 जुलै 1987 पूर्वी दिलेले ओळखपत्र/प्रमाणपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाईल. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, यासाठी मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन अतिरीक्त जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai