महापालिकेत SHE-Box अंमलबजावणीची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 16
महिला सुरक्षिततेसाठी ममता म्हात्रे यांचा पुढाकार
पनवेल ः कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या SHE-Box या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलची पनवेल महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शासकीय, निमशासकीय व संबंधित कार्यालयांमध्ये SHE-Box पोर्टलची अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे.
ममता म्हात्रे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळाच्या तक्रारी सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने नोंदविण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेले SHE-Box पोर्टल हे प्रभावी डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलची माहिती प्रत्येक महिला अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये विशेष जनजागृती अभियान, प्रशिक्षण कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, कोड, माहिती फलक आणि पोस्टर्स उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातूनही या पोर्टलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे. याबाबत बोलताना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.
SHE-Box हे एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ असून प्रत्येक महिलेला त्याची माहिती असणे आणि गरज पडल्यास निर्भयपणे त्याचा वापर करता येणे अत्यंत आवश्यक आहे. पनवेल महापालिकेत या पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीसाठी महिला व बालकल्याण समिती सातत्याने प्रयत्नशील राहील महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत केंद्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाची पनवेल महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालकल्याण समितीने उचललेले हे पाऊल महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai