1,292 नागरिकांची कॅन्सरची तपासणी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 25
मोबाईल व्हॅनद्वारेविशेष मोहीम
नवी मुंबई : कॅन्सरचे लवकर निदान व्हावे आणि नागरिकांना त्यांच्या घराजवळच तपासणीची सुविधा मिळावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विशेष कॅन्सर तपासणी मोहीम राबविण्यात आली. शासनामार्फत 3 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत नवी मुंबईत पाठविण्यात आलेल्या मोबाईल कॅन्सर तपासणी व्हॅनच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 1,292 नागरिकांनी कॅन्सरची तपासणी करून घेतली.
नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत 30 वर्षांवरील महिला व पुरुषांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी केली जाते. संशयित रुग्ण आढळल्यास पुढील तपासणी व उपचारांसाठी सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ येथे संदर्भित करण्यात येते. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून चिंचपाडा, कातकरीपाडा, रबाळे, तुर्भे, इंदिरानगर, शिरवणे, करावे आणि सीबीडी परिसरात तपासणी शिबिरे घेण्यात आली. या काळात मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोगासाठी आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. विविध केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला.कॅन्सरचे वेळेत निदान झाल्यास उपचारांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नागरिकांनी शरीरात कोणतेही असामान्य बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच तंबाखू, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या मोहिमेत तपासणी करून घेता न आलेल्या नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा. नवी मुंबईतील 30 वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांनी असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai