साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची निघृण हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 26
शवविच्छेदन अहवालातून सावत्र पित्याचं बिंग फुटलं
उरण ः उरणमध्ये लहान बालकाची हत्त्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडयाच्या या निष्पाप हट्टाचा संताप अनावर होऊन एका क्रूर सावत्र पित्याने त्याची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधील फणसवाडी (मोरा) येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर मुलगा खेळताना पलंगावरुन पडून जखमी झाल्याचा बनाव रचून गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचाही सावत्र पित्याचा डाव होता; मात्र मोरा सागरी पोलिसांच्या सतर्कतेने आणि शवविच्छेदन अहवालाने या हत्येचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेतील मृत बालक मोक्ष (3 वर्षे 5 महिने) हा त्याची आई काव्या आणि तिचा दुसरा पती जितेंद्र प्रदीप भिसे (28) यांच्यासह उरण-मोरा येथील फणसवाडी येथे राहत होता. मोक्ष हा जितेंद्र भिसे याचा सावत्र मुलगा असल्याने त्याला सतत किरकोळ कारणांवरुन मारहाण करुन त्याचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच होते. यावेळी मोक्षने आरोपी जितेंद्र याला तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांजवळ जायचं आहे, असा हट्ट धरला. या निष्पाप शब्दांचा भयंकर राग आल्याने आरोपी जितेंद्रचे मानसिक संतुलन सुटले. त्यामुळे त्याने चिमुकल्या मोक्षचे डोके थेट भिंतीवर आपटले आणि लाकडी काठीने त्याच्या पायांवर बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता, त्याने मोक्षला सोफ्यावर पाडून त्याच्या छातीवर जोरात ठोसा मारला. या जबर मारहाणीत मोक्षच्या बरगड्या तुटल्याने आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी जितेंद्रने दुपारी मुलगा घरात खेळताना अचानक पलंगावरुन खाली पडला व बेशुद्ध झाला, असा बनाव रचला. त्यानंतर मोक्षला तातडीने उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी 4 वाजता मोक्षला तपासून मृत घोषित केले. मुलगा मृत पावल्याचे स्पष्ट होताच आरोपी जितेंद्रने पोलिसांना न कळवता व शवविच्छेदन न करता बालकावर परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरु केली. या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांना पालकांच्या भूमिकेवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगडया फॅक्चर आणि जबर मारहाणीमुळे झालेला हत्येचा मृत्यू, असे डॉक्टरांनी धक्कादायक निष्कर्ष नोंदवले. वैद्यकीय अहवाल समोर येताच पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी जितेंद्रने हत्येची कबुली दिली. त्यानुसार आरोपी जितेंद्र प्रदीप भिसे याला हत्या आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अटक करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai