डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 35
सेबी अधिकाऱ्याच्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला 29 लाख 36 हजारांचा गंडा
उरण ः सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या ‘डिजिटल अटक’ आणि ‘मनी लॉन्ड्रिंग’ च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीचा एक गंभीर प्रकार उरणमध्ये उघडकीस आला आहे. उरण येथील बोरी नाका परिसरात राहणाऱ्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला टेलिकॉम कंपनी आणि सीबीआय अधिकाऱ्याच्या नावाने धमकी देऊन तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताराम हे सेवानिवृत्त आहेत. दि. 14 जुलै 2026 रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांक वरून या अनोळखी क्रमांकावरून एका महिलेचा फोन आला. सदर महिलेने स्वतःला टेलिफोन निगममधून बोलत असल्याचे सांगितले आणि शांताराम या नावाने मुंबईत एक बनावट सिमकार्ड वापरले जात असल्याचे सांगून धमकी दिली. या फोननंतर काही दिवसांनी या वेगवेगळ्या क्रमांकावरून वेगवेगळ्या व्यक्तींचे कॉल येण्यास सुरुवात झाली. कॉल करणाऱ्यांपैकी एकाने स्वतःला राजेश प्रधान नावाचा इनव्हेस्टिगेशन ऑफिसर, दुसऱ्याने राजेंद्र सिंग नावाचा सीबीआय अधिकारी आणि तिसऱ्याने सुनीलकुमार गौतम नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी शांताराम म्हात्रे यांना सांगितले की संदीप कुमार नावाच्या व्यक्तीच्या मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज स्मगलिंग आणि वुमन ट्रॅफिकिंग या गुन्ह्यात त्यांच्या नावाने आयसीआयसीआय बँकेत 78 लाख रुपये जमा झालेले आढळून आले आहेत आणि यात त्यांना अटक होऊ शकते. या भीतीपोटी आणि अधिकाऱ्यांच्या धाकाने शांताराम यांनी 14 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत वेगवेगळ्या वेळी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण 29 लाख 36 हजार 94 रुपये जमा केले. पैसे गेल्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शांताराम यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री उरण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब यथार्थ प्रणालीद्वारे नोंदवून घेतला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai