माथाडी कामगारांचा मेळावा रद्द

नवी मुंबई ः वाशी येथे माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त 23 मार्च रोजी होणारा माथाडी कामगारांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. तसेच मेळाव्याच्या आधी गुरूवारी 19 मार्च रोजी होणारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठकही होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना या विषाणूचा संभाव्य फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनने दिली आहे.