महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला 149 समुहांचाप्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 30
नवी मुंबई ः दिवाळीत बाळगोपाळांमार्फत बनविल्या जाणाऱ्या किल्यांच्या परंपरेला परंपरेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा मनामनात रुजविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा 2026-27’ मध्ये तब्बल 149 समुहांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती तसेच विशेषत्वाने लहान मुले आणि युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे उद्देश साध्य झाल्याचे समाधान महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. स्पर्धेतील शालेय गटात 26 तसेच खुल्या गटात 123 अशाप्रकारे 149 समुहांनी उत्साही सहभाग घेतला. अर्ज नोंदणी करून सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 149 किल्ले बांधणीच्या ठिकाणी परीक्षक जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्सचे इतिहासप्रेमी फाईन आर्ट कलावंत शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्राथमिक परीक्षण केले. या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी किल्लेबांधणी, त्याची रचना, त्यामधील रेखीवपणा याची पाहणी केली असून मुलांकडून किल्ल्याविषयीची माहितीही सादरीकरणातून जाणून घेतली. या सर्व किल्ल्यांचे व सादरीकरणाचे महानगरपालिकेमार्फत छायाचित्रण आणि छायाचित्रीकरण करण्यात आलेले आहे. या प्राथमिक फेरीतून शालेय गटात 6 व खुल्या गटात 19 किल्ल्यांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आलेली असून अंतिम फेरीच्या परीक्षणानंतर उत्कृष्ट 3 व उत्तेजनार्थ 3 किल्ल्यांना व आकर्षक रोख पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येणार आहेत. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी रु. 30 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रु. 20 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी रु. 10 हजार अशी 3 पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी रु. 20 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रु. 15 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी रु. 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 3 उत्तेजनार्थ पारितोषिके रु. 5 हजार प्रमाणे देण्यात येणार आहेत.
महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सणानिमित्त अंगणात किल्ले उभारण्याची परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा जागर करण्या-या आणि हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या अभिनव उपक्रमामध्ये 149 समुहांनी उत्साहाने सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai