घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त

मुंबई ः कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहेत. निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका सर्वांनाच बसत आहे. यात दिलासा मिळावा म्हणून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

एलपीजी गॅस सिलेंडर 60 रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशने ही घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार मुंबईत गॅस सिलेंडर 62 रुपयांनी स्वस्त असून गॅसची नवीन किंमत 714.50 झाली आहे. तर दिल्लीसुद्धा गॅस 61.50 रुपयांनी स्वस्त झाला असून नवीन किंमत 744 झाली आहे.