100 दिवस धावण्याचा अनोखा विक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 06, 2020
- 526
पनवेल : निरोगी स्वास्थासाठी प्रत्येकाने आपल्या शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती बळकट करणे आवश्क आहे. सूदृढ आरोग्यचा भाग म्हणून सलग 100 दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज 7 ते 10 किमीचे अंतर गाठत असत. दि.27 जून ते 4 ऑक्टोबरदरम्यान झंजे यांनी आपला 100 दिवस धावण्याचा विक्रम पूर्ण केला.
नवीन पनवेलमधील गुड मॉर्निंग रनर ग्रुपचे सदस्य आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी दररोज व्यायाम, योगा करत असतात. त्यातूनच झंजे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सलग 100 दिवस सलग धावण्याचा संकल्प केला. या संकल्पात ग्रुपचे सदस्य व पोलीस दलातील सेवेत असलेले चांगदेव भोसले, रवी कुमार, जयेश टेंबे, माधव भाहेकर हेही सहभागी झाले. या संकल्पादरम्यान सर्वांनी आपले ध्येय साध्य करत असताना, विविध पर्यटन ठिकाणे, गड-किल्ले आदींना भेट दिली. यामध्ये आंबेनळी घाट, मोरबे धरण, प्रतापगड, रायगड आदींसह रायगड-पनवेल परिसरातील पर्यटन ठिकाणांचा समावेश आहे. रविवारी पनवेलमधील पुष्पकनगर या ठिकाणी सुमारे 21 किमीचे अंतर गाठत आपला 100 दिवसांचा संकल्प पूर्ण केला. या काळात सुमारे 750 किमीपेक्षा जास्त अंतर सर्वांनी गाठले. मागील वर्षी अशाच प्रकारचा संकल्प गुड मॉर्निंग रनर ग्रुपच्या या सदस्यांनी पूर्ण केला.
शासकीय कामात कोणताही व्यत्यय न आणता, मी व माझ्या साथीदारांनी आम्ही स्वत: ठरविलेला संकल्प पूर्ण केला. चांगले आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येकाने अशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास, प्रत्येक जण सुदृढ बनेल. कोरोनासारख्या संकटात आपल्याला आपले स्वास्थ्य निरोगी राखता येईल. याकरिता प्रत्येकाने अशा प्रकारे संकल्प स्वीकारणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब झंजे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai