उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 23
निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त
उरण ः रायगड जिल्ह्यातील उरण तालुका निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे. तिसऱ्या मुंबईचा महत्वाचा परिसर असल्यामुळे येथे विविध औद्योगिकीकरण, शहरीकरण मोठया प्रमाणात सुरु आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड, मातीचा भराव करणे, झाडे वृक्ष वेली लावण्याकडे दुर्लक्ष करणे आदी विविध कारणांनी उरण तालुक्यातील पाणथळीची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या विविध प्रजातींच्या हजारो पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची खंत उरण मधील निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
उरणचे खाडी किनारे व पाणथळीवर फ्लेमिंगो उतरत होते. मात्र, येथील सततच्या मातीच्या भरावामुळे पाणथळी जवळपास नष्ट झाल्या आहेत. या कारणांमुळे पक्षी अन्नाच्या शोधात परिसरातील छोट्या पाणथळीवर येऊ लागले आहेत. उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबरअखेरपर्यंत अनेक जातींचे पक्षी पाणथळीवर उतरतात. त्यात जेएनपीए बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई व करळ आदी भागांतील पाणथळीवर दरवर्षी पक्षी उतरतातं. पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी असते. स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा भराव टाकून गाडल्या जात आहेत. आंतरभरतीचे प्रवाह पद्धतशीरपणे नष्ट केले जात आहेत.त्यामुळे विविध सजीव सृष्टी पशु पक्षी यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
बीएनएचएसने सूचीबद्ध केलेल्या सहा प्रमुख पाणथळ जागांपैकी बेलपाडा येथील एक जेएनपीएला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती व भेंडखळ आणि पाणथळ जागा एनएमआयआयए विकण्यात आल्या आहेत.उरण मधील विविध ठिकाणी असलेल्या पाण थळ चे वेळीच संरक्षण व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरण वाद्यांनी केली आहे. अन्यथा याचा विपरीत परिणाम निसर्ग चक्रावर, पर्यावरणावर होणार असल्याची चिंता निसर्गप्रेमी, पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली आहे.
पाणथळी जागा मातीचा भराव करून बुजवण्यात आल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. जैवविविधता राखणारा महत्त्वाचा दुवा त्यामुळे दुरावला गेला आहे. पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. निसर्गाचे, पाणथळ जागेचे, जंगलांचे संरक्षण संवर्धन झाले पाहिजे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्यास वेळ लागणार नाही. निकेतन ठाकूर, फ्रेंड्स ऑफ नेचर संघटना सदस्य तथा पर्यावरणवादी कार्यकर्ता उरण
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai