स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8500 रिक्त जागा भरणार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2020
- 769
नवी दिल्ली ः देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणार्या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या 8 हजार 500 रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ीलळ.ले.ळप वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.
एसबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अॅप्लिकेशन 2020 पुढील 10 डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.
अशी होणार निवड
एसबीआय अप्रेंटिस भरती 20202 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारावर होईल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी 2021 मध्ये आयोजित केली जाईल. ज्यामध्ये जनरल/फायनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्लिंश क्वांटिटेटिव्ह एप्टिट्युड आणि रीनजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्युड विषयांमधील एकूण 100 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. तसेच एकूण निर्धारित गुण 100 असतील. लेखी परीक्षेमध्ये 0.25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना स्थानिक परीक्षेसाठी निमंत्रित केले जाईल.
असा असेल ट्रेनिंग कालावधी/स्टायपेंड
एसबीआय अप्रेंटिस भरती 2020 निवड प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्य आणि जिल्ह्यातील ब्रँचमध्ये तैनात करण्यात येईल.
अप्रेंटिस काळ तीन वर्षांचा असेल. दरम्यान प्रशिक्षितांना पहिल्या वर्षी 15 हजार रुपये दरमहा स्टायपेंड मिळेल. दुसर्या वर्षी 16,500 आणि तिसर्या वर्षी 19,000 रुपये प्रतिमाह स्टायपेंड मिळेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai