पाणी देयकांसाठी ऑफलाईन सुविधा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 26, 2020
- 590
नवी मुंबईः सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या निर्देशानुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) म्हणजेच ऑफलाईन माध्यमातून पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑफलाईन माध्यमातून देयके भरता येत असल्यामुळे सिडको नळ जोडणी धारकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या या निर्णयाचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत असून सिडको नळ जोडणी धारकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. ऑफलाईन माध्यमातून देयक भरणा करण्यासाठी विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे त्याचप्रमाणे सिडकोच्या प्रत्येक नोडमधील नोडल ऑफीसमधूनदेखील ही सुविधा सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अथवा सिडको नोडल ऑफीसमध्ये जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) या स्वरूपात भरू शकतात. तसेच देयक भरल्याची पावतीही नागरिकांना प्राप्त होत आहे.
ऑफलाईन माध्यमातून ज्या नागरिकांना पाणी देयके भरायची असतील अशा सिडकोच्या नळ जोडणीधारकांनी आपली देयके संबंधित नोडनुसार पुढे दिलेल्या केंद्रांवर भरावीत :- खारघर - सिडको कार्यालय, खारघर; कळंबोली/नावडे/तळोजा - सिडको कार्यालय, कळंबोली; कामोठे - पाणी पुरवठा कार्यालय, सेक्टर-6अ, कामोठे; पनवेल (पूर्व)/करंजाडे/काळुंद्रे - सिडको कार्यालय, पनवेल; पनवेल (पश्चिम) - सेक्टर-12, पाण्याची टाकी, पनवेल; द्रोणागिरी - सिडको कार्यालय, द्रोणागिरी; उलवे - सिडको कार्यालय, उलवे; हेटवणे/सीबीडी सेक्टर-21/22 - रायगड भवन, सीबीडी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai