अर्बन हाटमध्ये आदिवासी कला-संस्कृतीचा महोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2026
- 24
नवी मुंबई : भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयांतर्गत कार्यरत ट्रायफेडच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये 23 ते 30 ऑक्टोबरदरम्यान आदि महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला आहे. या आठ दिवसीय महोत्सवात देशाच्या विविध भागांतील आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. या महोत्सवामुळे नवी मुंबईकरांना आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला आणि हस्तकलेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
आदिवासी उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनात पारंपरिक हस्तकला, हातमागावरील वस्त्र, कापड, दागिने, आदिवासी चित्रकला, बांबू व वेतापासून बनवलेल्या वस्तू, धातुकाम तसेच वनउत्पादनांपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे. या महोत्सवामुळे आदिवासी कारागीर, उत्पादक गट आणि महिलांच्या स्वयं-सहायता बचत गटांना आपली उत्पादने थेट ग्राहकांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासह रोजगार आणि उत्पन्नवाढीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांच्या हस्ते झाले. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा.डॉ. अजित कुमार खरे यांची यावेळी उपस्थिती होती. ट्रायफेडच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक तथा प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. तरुल डी.भावसार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना प्रोत्साहन देण या महोत्सवाला मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दिवाळीनिमित्त भेटवस्तूंची खरेदी करताना पारंपरिक आदिवासी हस्तकला आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai