बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2020
- 817
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यांत 71, दुसर्या टप्प्यात 94 तर तिसर्या टप्प्यात 78 मतदारसंघात अनुक्रमे 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल घोषित होईल.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या 6.7 कोटीवरून 7.2 कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये 3.79 कोटी पुरुष आणि 3.39 कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.
असा असेल निवडणुक कार्यक्रम
कोरोनाची लागण झालेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असणार्या रुग्णांना शेवटच्या एका तासात मतदान करता येईल. हे मतदान पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून पार पडेल.
80 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करण्याची मुभा.
राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष शक्य नसल्यास ऑनलाईन अर्जही भरता येणार. डिपॉझिटची रक्कमही ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची मुभा.
राजकीय नेत्यांना निवडणूक अर्ज दाखल करताना आपल्यासोबत दोनच व्यक्तींना आणण्याची मुभा.
मतदार आणि निवडणूक कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी 7 लाख सॅनिटायझर्स युनिट, 46 लाख मास्क, सहा लाख पीपीई किट, 6.7 लाख फेस शिल्ड, 23 लाख हातमोजे आदी सामुग्रीची व्यवस्था.
निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो करताना केवळ पाच गाड्यांना परवानगी. प्रचारावेळी सोशल डिस्टन्सिंगची पालन करण्याची सक्ती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai