प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची विशेष काळजी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 29, 2020
- 1307
महिलांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोग, मूत्रमार्गातील संसर्ग (यूटीआय) आरोग्यविषयक अशा अनेक तक्रारी भेडसावत असतात. चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी वर्षातून किमान एकदा स्त्रीरोगतज्ञाला भेट देणे गरजेचे आहे. एखाद्या महिलेने तिच्या स्त्रीरोगतज्ञाशी मासिक पाळी, प्रजनन आणि गर्भधारणेसंबंधित समस्यांवर चर्चा करावी तसेच शंकाचे निरसन करणे गरजेचे आहे.
पीसीओएस (पॉलीसिस्टिक अव्हेरियन सिंड्रोम), फायब्रोइड्स, स्तनाचे विकार आणि प्रजजनातील अडचणी अशा विविध मुदद्यांवर स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करणे महत्वाचे आहे.
जर आपला रक्तदाब 140/90 मिमी एचजीपेक्षा जास्त असेल मूत्रात जास्त प्रथिने असेल तर बाळ आणि आई दोघांनाही जास्त धोका असतो.ज्या महिला गर्भवती आहेत किंवा गर्भवती असल्याबद्दल शंका असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर गर्भावस्थेमध्ये आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यावर योग्य प्रकारे लक्ष ठेवू शकतील. मधुमेह, रक्तदाब आणि गर्भपात रोखण्याबाबत नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
ज्या स्त्रियांना गर्भारपणात धोका असतो होतो अशा स्त्रियांना रक्तस्त्राव किंवा संसर्ग होऊ शकतो. गर्भावस्थेतील मधुमेह किंवा मूत्रपिंडातील संसर्गावर डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते.स्त्रियांना विविध विकार व समस्यांसाठी तपासणी करणे आवश्यक आहे तसेच स्त्रीरोग तज्ञांकडून विविध समस्यांसाठी नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे. यामध्ये एसटीडी (लैंगिक संक्रमित रोग) यासाठी तपासणी करणे गरजेचे आहे. एक स्त्रीरोग तज्ञ आपल्या शरीरासाठी गर्भनिरोधकाच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल देखील सल्ला देतात. पुनरुत्पादक अवयवांच्या कर्करोगापासून बचावासाठी नियमितपणे तपासणी करा आणि एचपीव्ही लसांविषयी जाणून घ्या.
निरोगी राहण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा
1.वेळोवेळी आपले रक्तदाब, थायरॉईड, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासा. कर्करोग रोखण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी नेत्र तपासणी, त्वचेची तपासणी, दंत तपासणी, मॅमोग्राम, पेल्विक परीक्षा आणि पॅप स्मीयर चाचणी करा.
2.ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराने ग्रस्त महिलांची हाडे ठिसूळ होतात आणि हाडे नाजूक झाल्याने ती लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सेवन करा आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
3.योगा आणि मेडिटेशन सारख्या पर्यायांचा वापर करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
4.आपल्या कुटुंबातील अनुवंशिक आजारांबद्दल जाणून घ्या. जेणेकरून भविष्यात सावधगिरी बाळगता येऊ शकते.
5.ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे आणि सर्व प्रकारचे धान्य खा. मसालेदार, तेलकट, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. आपले धूम्रपान आणि मद्यपान मर्यादित करा.
6.दररोज व्यायाम करून शारीरिकरित्या सक्रिय रहा.
- डॉ. अनु विज, प्रसूति व स्त्रीरोगतज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, खारघर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai