खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पावसाळयात तुमचेही केस गळतायत का ?

पावसाळ्यात सामान्यतः बऱ्याच लोकांना केस गळतीचा त्रास होतो. आपल्या सर्वांना सुंदर वाटणारा पावसाळा हा योग्य काळजी न घेतल्यास आपल्या केसांसाठी काहीसा धोकादायक ठरू शकतो.

 • पावसाळ्यात केस गळण्याचे प्रमाण का वाढते?
  पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे बऱ्याचदा आपले केस अर्धवट ओले राहतात. वातावरणातील या आद्रतेमुळे केस हायड्रोजन शोषून घेतात. केसांची रासायनिक रचना ही  हवेतील हायड्रोजनला संवेदनशील असते आणि जास्त हायड्रोजन शोषून घेतल्याने केस ठिसूळ आणि  नाजूक बनतात. त्याशिवाय वातावरणातील आद्रतेमुळे टाळू नैसर्गिक तेल आणि पोषक घटकांपासून वंचित राहते. ज्यामुळे केस कमकुवत आणि कोरडे बनतात. शिवाय, आम्लीय पावसाच्या पाण्यामुळे आणि पाण्यातील विषारी घटकांमुळे संसर्ग आणि बुरशीचा धोका वाढतो ज्यामुळे टाळूला खाज सुटते आणि केस गळतात. परंतु, तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊन आणि त्यांना थोडेसे पोषण देऊन,हा केस गळतीचा त्रास आटोक्यात आणू शकता.
 • केसांच्या आरोग्यासाठी हे खा!
  पावसाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्याला लोह, झिंक आणि प्रथिनेयुक्त समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या आहारातील बायोटिन आणि झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. त्यामुळे खालील पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने केस गळतीची समस्या कमी व्हायला मदत होते.
 • मेथी 
  पावसाळ्यात तुम्ही केस गळतीला सामोरे जात असाल तर, तुमच्यासाठी मेथी हा एक उत्तम पर्याय आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये  जीवनसत्त्वे ए, क आणि के मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याशिवाय केसांच्या वाढीसाठी लागणाऱ्या फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील मुबलक असते. त्यामुळे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे कढी ,खिचडी किंवा फोडणीत घालून खाऊ शकता.
 • अंडी आणि मासे 
  अंड्यामध्ये प्रथिने (प्रोटीन) आणि बायोटिन हा केसांच्या वाढीसाठी लागणारा घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. आपले केस हे प्रथिनांपासून बनलेले असल्याने, प्रथिनांच्या कमतरतेमुळे केसांच्या मुळांना धोका पोहोचतो. याशिवाय अंड्यामध्ये झिंक आणि सेलेनियम यासारखे घटक उपलब्ध असल्याने केस गळती रोखण्यासाठी  अंडी खाणे हा उत्तम पर्याय आहे. अंड्याशिवाय ओमेगा थ्री आणि विटामिन डी ने समृद्ध असलेल्या माशांचा ( बांगडा, बोंबील पापलेट, सुरमई ) आहारात समावेश केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
 • सुकामेवा आणि बिया
  सुकामेवा हा विटामिन ई , बी, झिंक , सेलेनियम इत्यादी घटकांनी युक्त आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असला, तरीही भारतातील मध्यमवर्गीय गटाचा विचार करता सुक्यामेव्याऐवजी अळशीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बिया खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. सुकामेव्याप्रमाणे या बिया देखील विटामिन ई , बी, झिंक आणि सेलेनियमने समृद्ध असतात. साधारण 28 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने तुमच्या दैनंदिन आहारातील 50% विटामिन ई ची गरज पूर्ण होते. वाढत्या महागाईत सूर्यफुलाच्या बिया हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा उत्तम पोषक पर्याय ठरू शकतो.
 • कालवे / ऑईस्टर
  केसांच्या वाढीसाठी आणि त्यांची झीज रोखण्यासाठी झिंक हा घटक आहारात असणे आवश्यक असते. ऑईस्टर खाल्ल्याने स्त्रियांच्या आहारातील 96% झिंकची गरज पूर्ण होते. तर पुरुषांच्या दैनंदिन आहारातील 75% झिंकची गरज पूर्ण होते. पण त्याचसोबत जास्त प्रमाणात झिंकचे सेवन केल्याने तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आहारातील झिंकचे प्रमाण नियंत्रणात असणे गरजेचे आहे.

वर उल्लेख केलेल्या पदार्थांशिवाय सोयाबीन, कडधान्ये, रताळे आणि हिरव्या पालेभाज्या; तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतात. या शिवाय कमी ताण आणि उत्तम झोप या दोन गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही केस गळतीची चिंता सोडून पावसात भिजण्याचा आनंद मनसोक्त लुटू शकता.

- आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर आणि साक्षी नानकर 

(सूचना : सदर लेख फक्त सामान्य आहाराविषयक माहितीसाठी आहे. तुमच्या मेडिकल हिस्टरी नुसार तुमच्या पोषणाची गरज वेगळी असू शकते. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी/आहार तज्ञांशी संपर्क साधा.)


रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट