खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी

पाऊस म्हटल्यावर सोबत येतात काळेकुट्ट ढग, मातीचा सुवास, रंगीबेरंगी छत्र्या आणि विविध आजार. पावसाळ्यात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या डोके वर काढतात. घातक सूक्ष्मजीव रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करुन मानवी शरिरावर हल्ला करण्यास तयार असतात. बाहेरून आल्यावर शरीर कोरडे आणि निर्जंतुक केले तरीही, जंतूंपासून संपूर्ण संरक्षण मिळतेच असे नाही. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक असते. 

पावसाळ्यात पर्यावरणातील आर्द्रतेमुळे आपली पचनक्रिया मंदावते. बहुतेकदा भारतीय लोक पावसाळ्यात तोंडाला पाणी आणणारे मसालेदार पदार्थ जसे की वडा, समोसा, भजी आणि चहा-कॉफी यांना प्राधान्य देतात. त्यामुळे जंतूसंसर्ग तसेच फ्लू, विषाणूजन्य ताप, टायफॉइड अशा प्रकारचे रोग होण्याची भीती असते. म्हणूनच या रोगांशी लढण्यासाठी आणि आजारी न पडता पावसाचा आनंद घेण्यासाठी, आहारात काही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते.     भारतात पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या आहारामध्ये तळलेले अन्न, चहा, कॉफी, मांस, तृणधान्ये आणि कडधान्ये यांचा समावेश होतो. ज्यात कार्बोहायड्रेटचे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, परंतु सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता असते. म्हणूनच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, कार्बोहाइड्रेट आणि प्रथिनांसह सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहारात करणे गरजेचे ठरते. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले सूप हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. 

 • चिकन व्हेजिटेबल सूप
  चिकन व्हेजिटेबल सूप हे केवळ तोंडाला पाणी आणणारे नसून, पावसाळ्यात उबदार राहण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे. हे सूप बनवण्यासाठी कांदा, पालक, गाजर, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्या चिकनच्या हाडांसह शिजवा. त्यात सूक्ष्मघटकांचा समावेश करण्यासाठी दालचिनी, लसूण, आले, काळी मिरी, हळद आणि लवंग घाला. त्यानंतर हे सूप वीस मिनिटे शिजवा. चिकनची हाडे तुम्हाला झिंक, लोह, कोलाजेन हे घटक पुरवतील करतील. त्या शिवाय त्यामधून तुम्हाला ग्लाइसिन, प्रोलिन हे घटक मिळतील ज्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती अजून बळकट होईल. त्याशिवाय यामधून फायबर, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि इतर  रोगप्रतिकारक घटक देखील मिळतील. या सूप मधून मिळणारा झिंक हा सूक्ष्मघटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या टी पेशी सक्रिय करण्यात आणि अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे पावसाळ्यात हे चिकन सूप खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिकच मजबूत होईल यात शंका नाही.

 • मशरूम सूप
  पाऊस स्वतःच आपल्याला नैसर्गिक सुपर फूड ‘मशरूम' भेट देऊन जंतूंशी लढण्याचा मार्ग प्रदान करतो. रंग नसलेल्या अन्नामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते असा सर्वसाधारण समज आहे. पण मशरूम हा समज चुकीचे असल्याचा सिद्ध करतो. चियाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, कांदा, आले, लसूण, काळी मिरी आणि लिंबू पिळून तयार केलेल्या मशरूम सूपचा आनंद घेऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. मशरूममध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन, फोलेट, थायामिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, नियासिन, पोटॅशियम, तांबे, लोह आणि फॉस्फरस यासारखे अनेक सूक्ष्म घटक असतात. सेलेनियम शरीरातील किलर टी-सेल्सचे (उपद्रवी सूक्ष्मजंतूंना मारणाऱ्या शरीरातील पेशी) उत्पादन उत्तेजित करून रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्याशिवाय या सूपमधील मसाले अतिरिक्त सूक्ष्म पोषक देखील प्रदान करतात. शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम पर्यायी स्त्रोत आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी मशरूमसाठी सूप सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी एक वरदानच आहे.
 • मका आणि भाज्यांचे सूप
  पावसात भिजताना कोळशावर भाजलेला गरमागरम मका खाण्यासारखं सुख नाही. जर तुम्हाला मका आवडत असेल तर, मका आणि भाज्यांचे सूप हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी स्वर्ग सुखापेक्षा कमी नाही. कॉर्न आणि भाज्यांचे सूप बनवताना त्यात गाजर, कोबी, काळी मिरी, लसूण पाकळ्या आणि कांदा घालून बनवले जाते. मका हा जरी, कार्बोहायड्रेट्सनी भरलेला असला तरीही त्यात मोठ्या प्रमाणावर तंतू म्हणजेच फायबर असतात. हे तंतू आपल्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हानिकारक सूक्ष्मजीवांपासून रोग होण्याची शक्यता कमी होते. या सूप मधून मिळणारे कॅरोटीनॉइड्स, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून वाचवतात. या सूपमध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म पोषक घटक  आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे हे सूप  प्रभावीपणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
 • काळा वाटाणा आणि हरभरा सूप
  काळ्या वाटाणा ही भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात वापरल्या जाणार्या सामान्य डाळींपैकी एक आहे. काळ्या वाटाण्याचे सूप वाफेवर शिजवण्यासाठी, मोड आलेले काळे वाटाणे इतर डाळींबरोबर शिजवून वाटून घ्या. हे मिश्रण गाजर, टोमॅटो व कांदा ग्रेव्हीमध्ये शिजवा आणि त्यात दालचिनी, लवंग किंवा लसूण घाला. .काळा वाटाणा हा लोह आणि व्हिटॅमिन ए चा चांगला स्त्रोत आहे. थोडक्यात हे सूप खोकल्यापासून वाचवण्यासाठी एक उत्कृष्ट शाकाहारी पर्याय आहे.
 • फ्रूट सूप
  ‘फ्रूट सूप' ऐकायला विचित्र पण खायला चविष्ट असा सुपचा प्रकार आहे. फ्रूट सूप हे एक असे सूप आहे ज्यामध्ये विविध फळांचा मुख्य घटक म्हणून समावेश केला जातो. रेसिपीनुसार हे सूप गरम किंवा थंड सर्व्ह केले जाते. या रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट सूपसाठी मंद आचेवर संत्र्याचा रस ढवळून त्यात दालचिनी, लवंग आणि वेलची घाला. नंतर त्यात स्ट्रॉबेरी, हिरवे सफरचंद आणि केळी यांचे हव्या त्या जाडीचे तुकडे घाला.अशा प्रकारे बनवलेले हे सूप तुमच्या लहान मुलांसाठी, जंतूंशी लढण्याचा एक गोड आणि रंगीबेरंगी पर्याय आहे.

संपूर्ण पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी वर सूपचे काही मोजके पर्याय दिले आहेत. तुम्ही आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्ये वापरून, तुम्हाला हवे असलेले सूप तयार करू शकता. परंतु फक्त एकच भाजी असलेल्या साध्या सूपपेक्षा, वेगवेगळ्या भाज्या टाकून चविष्ट सूप बनवण्याकडे लक्ष द्या. याव्यतिरिक्त पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चांगले खा, बाहेरचे तळलेले अन्न टाळा, हायड्रेटेड राहा, आणि तुमच्या आहारातून जास्तीत जास्त पोषक आणि सूक्ष्मघटक मिळतील याची खात्री करा.

- आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर  (लेखक आहारतज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत.)
रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट