Breaking News
पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा बंदी हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्व सर्वांना प्रवासासाठी व्हिसा बंदी उठविल्याने याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.
कोरोना व्हायरसने निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली होती. आता भारतात येणार्या आणि भारताबाहेर जाणार्या परदेशी आणि भारतीय नागरिकांच्या अधिक प्रवर्गासाठी व्हिसा आणि वाहतुकीतील निर्बंधांमध्ये वर्गवारीनुसार शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार पर्यटक वगळता सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना व्हिसावर कोणत्याही हेतूने भारतात येण्याची परवानगी देत आहे. ते अधिकृतपणे चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात. यामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कोणत्याही नॉन शेड्यूल व्यावसायिक उड्डाणांद्वारे चालवल्या जाणार्या उड्डाणांचा समावेश आहे. अशा सर्व प्रवाशांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अलगीकरण आणि इतर आरोग्य / कोविड -19 बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्याची इच्छा असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय व्हिसासाठी त्यांच्या वैद्यकीय परिचर्यासह अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन, वैद्यकीय इत्यादी विविध कारणांसाठी भारतात येणं शक्य होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai