चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनची निराधारांना दिवाळी भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2020
- 728
गरजवंत मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप
नवी मुंबई ः यावर्षी दिवाळी आणि बालदिन एकाच दिवशी साजरे होत आहे. याचे औचित्य साधत चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व गरजवंत मुलांची दिवाळी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरी करण्यात आली. यामुळे त्या मुलांच्या चेहर्यावर आनंदाचे हास्य फुलले होते.
गेली पाच वर्ष हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जी मुले खरोखरच निराधार आहेत अशा गरजवंत मुलांना शिक्षणाकरिता मदत केली जाते. या वर्षी याच अनुषंगाने दिवाळीचे औचित्य साधत घाटकोपर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपकबाबा हांडे, संतोष खरात, राजू घुगे, स्नेहा खुराडे, चंद्रमणी जाधव, चंद्रकांत कुंजीर व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम संस्थेचे सर्वेसर्वा विशाल गारगोटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतो. यावेळी मुलांना दप्तर, पुस्तके, कंपास पेटी, नोटबुक्स, एवढेच नव्हे तर खेळणी सुद्धा भेट म्हणून देण्यात आली. यामुळे दिवाळी मध्ये त्यांच्या ओठावर हास्य उमलले. ही संकल्पना ज्यांनी अमलात आणली ते विशाल गारगोटे गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रात आरोग्य, शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मोरया इंटरटेनमेंट ही संस्था स्थापन करून शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. याचाच भाग म्हणून पद्मश्री अनुप जलोटा, पद्मभूषण जाकीर हुसेन, पद्मभूषण अमजद अली, पद्मश्री शुभा मुग्दूल, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व महेश काळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सहायता निधी उपलब्ध केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, समाजात कित्येकांना मदतीची गरज असते त्यातच बालपण हे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी योग्य मदत व दिशा मिळाली तर बालपणाला एक चांगले वळण लागू शकते. कित्येक मुलांना ते निराधार असल्याने योग्य मदत मिळत नाही व ते गुन्हेगारीकडे वळतात. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा समाजाचा एक घटक मानून त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे व त्यांचे आयुष्य सुखकर केले पाहिजे यातूनच समाजाचे व देशाचे हित साधले जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai