सीबीआयला चौकशीसाठी राज्याची परवानगी आवश्यक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 19, 2020
- 808
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली ः केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) च्या कार्यपद्धतीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी तपासासाठी सीबीआयला राज्यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. याविषयी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी, त्या राज्याची संमती अनिवार्य आहे, असा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, या तरतुदी घटनेच्या संघराज्य संरचनेच्या अनुरुप आहेत.
न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय उत्तर प्रदेशातील फर्टिको मार्केटिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरूद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात दिला आहे. कलम 6 अंतर्गत राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआयकडे तपासाचे आदेश नाही आहेत, असे आरोपींनी म्हटले होते. सुनावणीदरम्यान, पुढे असेही म्हटले आहे की एफआयआर दाखल करण्यापूर्वी संमती मिळाली नाही तर संपूर्ण तपास रद्द होईल.
दरम्यान, नुकताच महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढत सीबीआयला राज्यात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. तथापि, महाराष्ट्र शासनाने परवानगी मागे घेतल्याने सध्या सुरू असलेल्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, भविष्यात महाराष्ट्रातील नवीन प्रकरणाची चौकशी सीबीआयला करायची असेल तर न्यायालयाने चौकशीचे आदेश न दिल्यास राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai