भारताने बुक केले कोरोनाचे 160 कोटी डोस
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 04, 2020
- 906
नवी दिल्ली ः कोरोना व्हायरस लसीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत कोरोनाव्हायरस लसीचे तब्बल 160 कोटी डोसची बुकिंग केली आहे. जगभरात लशीच्या बुकिंगसंदर्भात ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत यूरोपियन यूनियनने 158 कोटी तर अमेरिकेने 100 कोटीहून अधिक कोरोना लशींचे बुकिंग केले आहे. या लशी ट्रायलमध्ये यशस्वी ठरल्या तर वापराची मंजुरी मिळताच लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.
जगभरात ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या लशीची मोठी मागणी आहे. अनेक देशांनी या लसीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्राजेनेकाकडून क्लिनिकल ट्रायल केले जात आहे. भारत आणि अमेरिकेने या लशीचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. या शिवाय नोव्हावॅक्सच्या लसीचे 120 कोटी डोसदेखील बुक करण्यात आले आहेत. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियन कोरोना लस स्पुटनिकच्या 10 कोटी तर नोवाव्हॅक्सच्या लसीच्या 100 कोटी डोससाठी डील केली आहे.
भारत रशीयन लशीचे उत्पानही करणार
भारत रशियन कोरोना लस स्पुटनिकचेही वर्षाला 100 मिलियन डोस तयार करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मा यांच्यात करार झाला आहे. आरडीआयएफने म्हटले आहे, की 2021च्या सुरुवातीला या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही लस मानवी परीक्षणाच्या तिसर्या टप्प्यावर 91.4 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा रशियन कोरोना लस स्पुतनिक त कडून करण्यात आला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai