Breaking News
अलिबाग : कोरोनामुळे सुरुवातीच्या दोन महिन्यातील मद्यनिर्मिती आणि विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 46.47 टक्के महसुलात घट झाली आहे. यंदा केवळ 277 कोटी 12 लाख 78 हजार 149 रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे. जवळपास 240 कोटी 60 लाख 73 हजार 014 रुपयांचा महसूल कमी आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधिक्षक किर्ती शेडगे यांनी दिली. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात मोठया प्रमाणात महसूलावर परिणाम झालेला असताना ऑक्टोबर महिन्यात मात्र पर्यटनाला सुरुवात झाल्याने गेल्या वर्षी पेक्षा 42 टक्कयांनी महसूलात वाढ झाली.
पर्यटन केंद्र असलेल्या एकटया रायगड जिल्ह्यातून राज्य सरकारला दरवर्षी शेकडो कोटींचा महसूल मिळतो. मद्यविक्री, निर्मितीतून गेल्या वर्षी सरकारला तब्बल 517 कोटी 73 लाख 51 हजार 163 रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा त्यात तब्बल 46.47 टक्क्यांची घट झाली आहे. लॉकडाऊन झाल्याने नवीन आर्थिक वर्षातील पहिल्याच एप्रिल महिन्यात 90.74 टक्के इतका महसूल बुडाला. 2019-20 मध्ये 67 कोटी 75 लाख 92 हजार 771 इतका महसूल प्राप्त झाला होता. तर 2020-21 मध्ये 6 कोटी 27 लाख 27 हजार 297 इतक्याच महसूलावर समाधान मानावे लागले. तर मे महिन्यात 73.39 टक्के महसूलावर पाणी सोडून द्यावे लागले. 2019-20 मध्ये 87 कोटी 24 लाख 50 हजार 421 इतका महसूल प्राप्त झाल होत्या त्याच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे यंदा मात्र 23 कोटी 22 लाख 1 हजार 866 कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकला. तर जूनमध्ये पुन्हा हा आलेख खाली -63.77 वर झुकला. 2019 मध्ये 83 कोटी 77 लाख 61 हजार 726 एवढया उत्पन्नावरुन 30 कोटी 35 लाख 15 हजार 455 वर उत्पन्न घसरले. तर जुलैमध्ये 73 कोटी 40 लाख 94 हजार 181 महसूल 2019 मध्ये जमा झाला होता. त्या तुलनेत -42.67 महसूल गोळा झाल्याने 42 कोटी 08 लाख 34 हजार 872 रुपयांचा महसूल जमा झाला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा विक्रीचे प्रमाण कमी झाल्याने -49.42 टक्क्यांवर विक्री खाली आली. 2019 मध्ये 73 कोटी 39 लाख 14 हजार 005 एवढया उत्पन्नावरुन थेट 37 कोटी 12 लाख 44 हजार 175 इतकेच महसूल गोळा होऊ शकले. तर सप्टेंबर महिन्या बर्यापैकी दिलासा मिळाला असला तरी -31.29 टक्क्यांपर्यंत आलेख गेला. गेल्या वर्षी 67 कोटी 57 लाख 35 हजार 439 एवढा महसूल जमा झाला होता. तो 2020 सप्टेंबर मध्ये 46 कोटी 42 लाख 75 हजार 594 वर गेला. त्यानंतर समाधानकाररित्या महसूला वाढ झाली ती ऑक्टोबर महिन्यात 6 महिने मोठी तफावत होत असल्याने नुकसानीत असलेले उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात या महिन्यात मोठया प्रमाणावर पर्यटनाला पुर्ववत सुरुवात झाल्याने 41.91 टक्क्यांवर महसूल येऊ शकल्याने दिलासा मिळाला. गेल्या वर्षी 64 कोटी 58 लाख 02 हजार 620 वरुन चक्क 91 कोटी 64 लाख 78 हजार 890 वर महसूल वसूलीने भरारी घेतली. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत वाढ होऊ शकली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai