1.4 लाख जागांसाठी 2 कोटी अर्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2020
- 1321
रेल्वेत मेगा भरतीला सुरुवात
नवी दिल्ली : रेल्वेतील विविध पदांसाठी 1.4 लाख जागा भरणार आहेत. यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख जणांनी अर्ज केला आहे. आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. परीक्षेआधी परीक्षार्थींना कोविड टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत मास्कचा वापरही बंधनकारक असणार आहे.
तीन टप्प्यात ही भरती प्रक्रिया होणार आहे. मंत्रालयासाठी दिलेल्या उमेदवारांची 15 ते 18 डिसेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात कम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल. तर दुसर्या टप्प्यात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगीरीची परीक्षा होईल. तर तिसर्या टप्प्यातील परीक्षा 20021 मध्ये होणार आहे. नव्या वर्षात एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय. दुसरी लाट येणार असं म्हटलं जात होतं पण तशी चिन्ह दिसत नाहीयत. त्यामुळे नव्या वर्षात लोकल सुरु व्हायला अडचण नसावी अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली.
31 डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली होती. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai