Breaking News
मुंबई : कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्याने राज्य सरकारने झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबत परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक, सामाजिक अंतर राखणं गरजेचं, सतत हात धुणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai