Breaking News
नवी मुंबई ः मराठी भाषेच्या आग्रहासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आक्रमक असल्याचे वारंवार पाहण्यात येते. मराठी भाषेवरून आणखी एक प्रकरण वाशी टोळनाक्यावर समोर आले आहे. वाशी टोल नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही? असा जाब विचारला जात असताना एका मराठी तरुणाने मध्यस्थी करताना राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देत त्या टोळनाक्यावरील कर्मचार्याला धडा शिकवला आहे.
वाशी नाक्यावर काम करणार्या उत्तर भारतीय कर्मचार्यास मराठी येत नसल्याने मनसे पदाधिकार्यांने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मनसे पदाधिकार्याचा टोल नाक्याच्या कर्मचार्यांसोबत वाद निर्माण झाला. त्यानंतर तिथे उपस्थित मराठी कर्मचारी आला व मनसे पदाधिकारी त्यांच्यात वादंग माजला. शिवाय राज ठाकरेंना जाऊन माझं नाव सांग, असेही वक्तव्य संबधित कर्मचार्यांने केले. तसेच टोल नाक्यावर काम करण्यास मराठी कर्मचारी आणून द्या, असेही त्या कर्मचार्याने सांगितले. त्यानंतर नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी टोल नाक्यावरील त्या कर्मचार्यांला शोधले, त्यानंतर मनसे मध्यवर्ती शाखेत नेऊन मारहाण केली तसेच माफी मागण्यास लावली. टोल कर्मचारी व मनसे पदाधिकारी यांच्या वादांगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai