तुझी आणि माझी ‘मैत्री’

मैत्रीत मनमोकळंपणाने बोलता येत
म्हणून मैत्रीत मन व्याकुळ होत
अनेकांशी नात जोडायला हे जग पडलंय 
मैत्रीतलं जग मात्र मोजक्यानाचा कळलंय
मैत्रीत प्रत्येक क्षणाला नातं नवं असत
पण जूनं असल्या सारख भासत
तुझ्या सोबत गोष्टी बोलव्याशा वाटतात 
का कुणास ठाऊक मन मोकळं तुझ्याकडे करावंसं वाटत
किती संकट आली म्हणून मी कधी डगमगून नाही जात 
त्यातून मार्ग काढण्याच बळ तुझ्याकडून मिळत
प्रत्येक क्षणाला गोड असणारी
विश्वासांन नातं जपणारी
अशी तुझी आणि माझी ‘मैत्री’

- प्रसाद शांताराम मेस्त्री