Breaking News
1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा ; केंद्र सरकारचा निर्णय
मुंबई : सध्या 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. लवकरच कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसर्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. मोदींनी यावेळी कोरोना टियर 2 आणि टियर 3 मधील शहरांमध्ये वाढत असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसर्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai