सी.एस.आर फंडातून ऑक्सिजन सीलिंडर व कॉन्सन्ट्रटर

पनवेल : पनवेल तालुक्यातील कोरोना रूग्णाची वाढणारी रूग्ण संख्या व त्यातील गंभीर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणाची कमतरता लक्षात घेवून पनवेल तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयातील गरीब व गरजू रूग्णांसाठी निधी चौधरी, जिल्हाधिकारी यांच्या आव्हानास प्रतिसाद देवून हिन्दालको इंन्डस्ट्री लि, तळोजा(आदित्य बिर्ला ग्रुप) यांच्या सी.एस.आर फंडातून 20 जम्बो ऑक्सिजन सीलिंडर व 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटर खरेदी करून तहसीलदार कार्यालय, यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या वैद्यकीय उपकरणाचे हिन्दालको इंन्डस्ट्री लि.तळोजाचे सुधीर मिश्रा, (हेड ऑफ द एचआर) आणि आय आर व कंपनीच्या इतर अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या 20 जम्बो ऑक्सिजन सीलिंडर व 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटरचे समक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर 20 जम्बो ऑक्सिजन सिलींडर व 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटर विजय तळेकर-तहसीलदार पनवेल यांनी डॉ. सचिन संकपाळ,(अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय) पनवेल यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे या वैद्यकीय उपकरणाचा उपयोग पनवेल तालुक्यातील शासकीय रूग्णालयात उपचार घेणार्‍या गरीब, गरजू रूग्णांना होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी हिन्दालको कंपनीचे ईलेक्ट्रीक विभागाचे प्रमुख सी.जी.जस्टीन, लहू रौंधळ, सचिन मलगौडी, डॉ. सचिन संकपाळ, अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय पनवेल तसेच तहसील कार्यालयातील तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार संजिव मांडे, राहुल सुर्यवंशी, एकनाथ नाईक, नालंद गांगुर्डे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.