टेस्टविनाच मिळेल लायसन्स
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 12, 2021
- 1202
एक जुलैपासून लागू होणार ड्रायव्हिंगशी संबंधित नवा नियम
नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून ड्रायव्हिंगशी संबंधित नियमामध्ये मोठा बदल होतो आहे. नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग टेस्ट न देण्याची सूट नागरिकांना मिळणार आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नवे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. ड्रायव्हिंग सेंटरवर नोंदणी करणार्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि माहिती मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. सद्य परिस्थितीत रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यास मदत होणार आहे.
असा असेल नियम
- 1 जुलै, 2021 पासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणार्यांना मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ड्रायव्हरांना अशा मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून प्रशिक्षण घेतल्यास लायसन्स मिळणे सोपे होणार आहे.
ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीचे मुद्दे
- उमेदवारांना हाय क्वालिटी ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सिम्युलेटर आणि खास ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकने युक्त असेल.
- या सेंटर्सवर मोटर वाहन अधिनियम, 1988 अंतर्गत आवश्यकतेनुसार रेमिडियल आणि रिफ्रेशर कोर्सचा फायदा घेता येतो
- या केंद्रांवर यशस्वीरित्या परीक्षा पास करणार्या उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्टमधून सूट मिळेल. सध्या रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून ड्रायव्हिंगसाठीची टेस्ट घेतली जाते.
- मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे होणार आहे. या केंद्रांना उद्योगांच्या गरजेनुसार विशिष्ट ट्रेनिंग देण्याचीदेखील परवानगी आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai