वेळेआधीच तिसर्या लाटेला आमंत्रण देऊ नका
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 29, 2021
- 557
पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रात सोमवारपासून कोव्हीड प्रतिबंधात्मक तिसर्या स्तरासाठीची नियमावली लागू करण्यात आली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे विभाग कार्यालय व मुख्यालय स्तरावरून काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश विशेष दक्षता पथकांना आयुक्तांनी आदेशित केले आहे. तसेच संभाव्य तिसर्या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढ करण्यात येत असलेल्या सर्व आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी 31 जुलैची डेडलाईन दिली.
दुसरी लाट काही प्रमाणात ओसरू लागल्याचे निदर्शनास आले तरी महानगरपालिकेने टेस्टींगचे प्रमाण कमी केलेले नाही. सध्या नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट भागांमध्ये टारगेटेड टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग वाढवून कोव्हीड पॉझिटिव्ह असणारे सर्व रूग्ण शोधून काढणे व त्यांना विलगीकरणात ठेवून त्यांची हालचाल प्रतिबंधित केल्यामुळे कोव्हीडचे पुढचे संक्रमण रोखणे हा उद्देश नजरेसमोर ठेवून टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. शनिवारी व रविवारी मॉलमध्येही टेस्टींग केले जात होते. तथापि नव्या तिसर्या स्तरातील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार मॉल बंद झाल्याने येथील टेस्टींग होणार नसून आता मार्केट व बसडेपो याठिकाणी टेस्टींग सुरु करण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नेरुळ व ऐरोली रुग्णालयांतील आयसीयू सुविधा निर्मितीचे कामाचा आढावा घेताना स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल कामे 31 जुलै हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून अथक काम करून पूर्ण करावीत असे निर्देश अभियांत्रिकी विभागास आयुक्तांनी दिले. याला समांतरच येथील आरोग्यविषयक उपकरणे, यंत्रसामुग्री, औषधे उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी व 31 जुलैपर्यंत तीही पूर्ण करून घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या. या सर्व बाबींची नेमकी कोणत्या टप्प्यातील कार्यवाही सुरू आहे याचा सुविधानिहाय आढावा आयुक्तांनी बारकाईने घेतला. ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याकरिता नियोजन करण्यात आले असून 5 पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्टपैकी एका प्लान्टचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चारही ऑक्सिजन प्लान्टची कामे 31 जुलैपर्यंत पूर्ण होतील याकडे लक्ष ठेवून प्लान्ट उभारणीची कार्यवाही विहित वेळेत करावी व सीएसआर निधीतून उपलब्ध होणार्या एका प्लान्टचीही कार्यवाही जलद सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. या सोबतीनेच ऑक्सिजन स्टोरेजचे 2 प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचेही सूचीत करण्यात आले. यासोबतच ड्युरा सिलेंडर वाढ करण्याबाबत गतीमान कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या.
कोव्हीड विषयक आरोग्य सुविधांमध्ये वाढ करतानाच नॉन कोव्हीड आरोग्य सुविधांच्या पूर्ततेकडे विशेषत्वाने प्रसूतीविषयक बाबींकडे लक्ष देत वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्याच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच त्या प्रमाणात रुग्णवाहिकांचीही वाढ करण्याच्या दृष्टीने 2 दिवसात आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तिसर्या लाटेविषयी जागतिक सद्यस्थितीचा आढावा घेऊन व नामांकित आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली अभ्यासपूर्ण निरीक्षणे व मते विचारात घेऊन कोव्हीडच्या तिसर्या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना करीत आहे. नागरिकांनीही कोव्हीड अनुरूप योग्य वर्तन ठेवत सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करून तसेच लसीकरण करून घेऊन तिसरी लाट लांबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai