मंत्रिमंडळ विस्ताराची नावं जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2021
- 985
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणार्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाचा राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश
१) नारायण राणे
२) कपिल पाटील
३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )
४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)
५) रामचंद्र प्रसाद सिंघ
६) अश्विनी वैष्णव
७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)
८) किरन रिजिजू
९) राज कुमार सिंघ
१०) हरदीप पुरी
११) मनसुख मांडविया
१२) भुपेंद्र यादव
१३) पुरुषोत्तम रुपाला
१४) जी. किशन रेड्डी
१५) अनुराग ठाकूर
१६) पंकज चौधरी
१७) अनुप्रिया पटेल
१८) सत्यपाल सिंघ बाघेल
१९) रजीव चंद्रशेखर
२०) शोभा करंदलाजे
२१) भानू प्रताप सिंघ वर्मा
२२) दर्शना विक्रम जारदोश
२३) मिनाक्षी लेखी
२४) अन्नपुर्णा देवी
२५) ए. नारायणस्वामी
२६) कौशल किशोरे
२७) अजय भट्ट
२८) बी. एल वर्मा
२९) अजय कुमार
३०) चौहान दिव्यांशू
३१) भागवंत खुंबा
३२) प्रतिमा भौमिक
३३) सुहास सरकार
३४) भागवत कृष्णाराव कराड
३५) राजकुमार राजन सिंघ
३६) भारती प्रवीण पवार
३७) बिश्वेश्वर तूडू
३८) सुशांतू ठाकूर
३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
४०) जॉन बिरला
४१) डॉ. एल मुरगन
४२) निशित प्रमाणिक
४३) डॉ. विरेंद्र कुमार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai