कोव्हीड टेस्टींग करण्यात नवी मुंबई पालिका राज्यात अग्रेसर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 19, 2021
- 575
नवी मुंबई ः कोव्हीडच्या दुसर्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत असून कोरोना रुग्णांचे दैनंदिन बाधीत प्रमाण स्थिर होताना दिसत आहे. अशावेळी संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड टेस्टींगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली असून टारगेटेड टेस्टींगवर भर दिलेला आहे. सध्या दररोज 7 हजारहून अधिक नागरिकांची कोव्हीड टेस्टींग केली जात असून मागील 15 दिवसात 99 हजार 856 म्हणजे साधारणत: 1 लाख नागरिकांची कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे.लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्ट करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या साधारणत: 15 लक्ष असून त्यामध्ये 13 लक्ष 6 हजार 517 कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट जितकी उशीरा येईल तितकी हानी कमी होईल हे लक्षात घेऊन तिसर्या लाटेचा प्रादुर्भाव विलंबाने सुरु होण्याकरिता कोव्हीड विषाणूला आहे त्याच ठिकाणी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता रुग्णशोधावर लक्ष केंद्रीत करून हॉटस्पॉट एरीयामध्ये टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. एखाद्या इमारतीमध्ये एक रूग्ण जरी आढळला तरी ती इमारत हॉटस्पॉट जाहीर करून इतर रहिवाशांमध्ये कोव्हीडचा प्रसार होऊ नये याकरिता इमारतीमधील प्रत्येक नागरिकाचे टेस्टींग करण्यात येत आहे.
या टेस्टींगच्या माध्यमातून कोव्हीडची कोणतीही दर्शनी लक्षणे दिसत नसलेले रुग्ण, जे सर्वसाधारणपणे सापडले नसते मात्र त्यांच्यामार्फत कोव्हीडचा प्रसार झाला असता असे रुग्ण निदर्शनास येत असल्याने त्यांचे त्वरीत विलगीकरण करून कोव्हीडची साखळी रोखणे शक्य होत आहे. अशा सर्वसाधारण भासणार्या व कोव्हीडची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या पॉझीटिव्ह रुग्णांमुळे कोव्हीडचा प्रसार जलदगतीने वाढू शकतो हे लक्षात घेऊन संबंधीत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून इमारतीमधील सर्व रहिवाशांचे कोव्हीड टेस्टींग करण्यात येत आहे. याकरिता नागरी आरोग्य केद्रांना दैनंदिन टेस्टींगचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. अशाप्रकारे टेस्टींगमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आज जरी रुग्णांची संख्या काहीशी वाढलेली दिसली तरी भविष्यात कोव्हीडचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात आजच्या टेस्टींगची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai