Breaking News
मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गात 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ओबीसी प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण जाहीर केले.
या आरक्षणाचा फायदा यूजी आणि पीजी मेडिकल / डेंटल कोर्स (एमबीबीएस / एमडी / एमएस / डिप्लोमा / बीडीएस / एमडीएस) प्रवेश घेणार्यांना मिळू शकेल. ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील लोकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी घेणार्यांपैकी ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 5550 विद्यार्थ्यांना थेट मोठा फायदा होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai