‘सुपरमॉम’ मेरी कोमचा पराभव

टोकियो ः हिंदुस्थानची दिग्गज महिला बॉक्सर एमसी मेरीकोम हिचा धक्कादायक पराभव झाला. 38 वर्षीय मेरी कोम हिला ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कोलंबियन खेळाडू इंग्रिट वालेंसिया हिने 3-2 असे पराभूत केले. 51 किलो वजनी गटात मेरी कोमला पराभवा पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रीडा प्रेमींना धक्का बसला आहे. 

सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कॉम हिचा गुरुवारी कोलंबियाच्या इंग्रिट वालेंसिया हिच्याशी सामना झाला. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली. पहिली फेरी वॅलेन्सियाने 1-4 अशी जिंकली. दुसर्‍या फेरीत मेरी कोमने जोरदार कमबॅक करत ही फेरी 3-2 अशी जिंकली. पण तिसर्‍या फेरीत तिसर्‍या फेरीत वॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केलं नाही तर सामना 3-2 ने जिंकला.