आदिवासी बांधवांचा मेळावा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2021
- 840
पनवेल : रायगड जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्याप्रमाणात असून बहुतेक आदिवासी समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला, अशिक्षीत व असंघटीत आहे. त्याचा गैरफायदा बिगर आदिवासी लोक घेत असल्याचे शासनाचे लक्षात आल्याने तसेच त्यांना शासनाकडून दिल्या जाणार्या विविध योजनांची माहिती देण्याचे दृष्टीने विजय तळेकर, तहसीलदार पनवेल यांनी प्रेरणा चॅरीटेबल ट्रस्ट रीस रसायनीच्या अध्यक्षा, सुशिला मेरी व संस्थेच्या केशर पाटील यांनी आदिवासी समाज बांधवांचा मेळावा आयोजित केला होता.
सदर मेळाव्यात आदिवासी समाजाकरीता शासनाकडून दिल्या जाणार्या विविध योजनांची माहिती तहसीलदार तळेकर यांनी दिली. महसूल विभागाकडून विशेषत: दिल्या जाणार्या योजनांमध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड, संजयगांधी निराधार योजनेखाली पात्र व्यक्तींना देण्यात येत असलेला आर्थिक लाभ, केंद्र शासनाकडील राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आदिवासी समाज अशिक्षीत असल्याने जातीचे प्रमाणपत्र देताना येणार्या अडचणीबाबत विशेष मार्गदर्शन करून ज्या आदिवासी बांधवाकडे जातीचा पुरावा नसेल त्याठिकाणी समाजाच्या रूढी, परंपरा याबाबत प्रत्यक्ष मंडळ अधिकारी व आदिवासी प्रकल्प निरीक्षक यांचा प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल विचारात घेवून सदर जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडे शिफारसी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आदिवासी समाजाला देण्यात येणारी पिवळी रेशन कार्डबाबत आवश्यक ती तात्काळ चौकशी करून देण्यात येतील, तसेच सदर रेशनकार्ड अन्नसुरक्षा योजनेतील धान्य त्वरीत मिळणेसाठी संगणकीय प्रणालीत समाविष्ट केली जातील. तसेच अन्नसुरक्षा योजना व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत दिले जाणारे मोफत धान्य आदिवासी भागात धान्य दुकानदार देत आहे किंवा कसे याबाबतही जाणून घेवून माहे नोव्हेंबर 2021 पर्यंत अन्नसुरक्षा योजना व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य दिले जाईल यांची आठवण करून दिली. या प्रसंगी तहसीलदार यांनी मेळाव्यात प्रत्यक्ष आदिवासी बांधवांशी त्यांना शासनाचे विविध योजनाचा लाभ घेताना येणार्या अडचणीबाबत विचारणा करून त्याबाबत शंकाचे नीरसन करण्यात आले. तसेच चावणे ग्रामपंचायतीमध्ये कँम्पचे आयोजन करणेचे आश्वासन देण्यात आले. या मेळाव्याला नायब तहसीलदार संजय मांडे, राहुल सुर्यवंशी, एकनाथ नाईक, कांबळे व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai