पाणथळावरील गोल्फ कोर्सला विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2021
- 698
प्रकल्पाच्या चौकशीचे केंद्राकडून निर्देश
नवी मुंबई ः नेरुळ येथील एनआरआय आणि टीएस चाणक्य येथे फ्लेेमिंगोचा वावर असणार्या पाणथळ क्षेत्र नाहिसे करुन तेथे सिडकोमार्फक गोल्फे कोर्स उभारण्यात येणार होते. मात्र याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. याची तक्रार केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती. त्याची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करुन योग्य कारवाई करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण विभागाला दिले आहेत.
नेरुळ सेक्टर 60 येथील पाणथळ जागेवर फ्लेेमिंगोचा, स्थलांतरीत पक्षांचा वावर असतो. मात्र या जागेवर भराव टाकून तेथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याचा प्रस्ताव सिडकोने आणला आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. यामुळे पर्यावरणाचा र्हास होणार असल्याने सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे सदर जागा पाणथळ नसल्याचा पुरावा सादर करुन सिडकोने महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापकीय प्राधिकरणकडून बांधकाम परवानगी मिळवली आहे. याबाबत सेव्ह नवी मुंबई वेटलँण्ड फोरमचे सुनील अगरवाल आणि इतर संस्थांनी केंद्रिय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. पाणथळसंदर्भातले पुरावेही त्यांनी सादर केले. त्याची दखल घेत पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे डॉ एम.रमेश यांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण विभागाला दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai