समान काम, समान वेतन मार्गी लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2021
- 894
नवी मुंबई : गेली अनेक वर्षांपासून महापालिका कंत्राटी कामगारांचा ‘समान काम, समान वेतन’ हा प्रश्न प्रलंबित आहे. सदर प्रकरणी सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळासह पालिका आयुक्त बांगर यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालून समान काम, समान वेतनाची मागणी निकाली काढण्याची विनंती केली होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील एकूण 7,200 कंत्राटी कामगार असून ते पालिकेच्या स्थापनेपासून विविध विभागांत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या कामगारांचा समान काम समान वेतन हा प्रश्न प्रलंबित आहे. या कामगारांपैकी साधारण 1500 कामगार कल्याण ग्रामीण भागातून कामाला येतात. या कामगारांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालिका मुख्यालय व ऐरोेलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनला भेट दिली. त्यावेळी कामगारांनी केेलेल्या मागणीच्या अनुषंगाने खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, समाज समता कामगार संघाचे खजिनदार दादासाहेब निकालजे, गजानन भोईर, मंगेश लाड यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीची दोन दिवसांत बैठक घेऊन समितीच्या अहवालाचा आढावा घेऊन सदर कामगारांना देखील धोरणानुसार वेतन देण्याचा निर्णय त्वरित घेतला जाईल असे आश्वासन दिले. कोविड काळात काम करणार्या कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ देण्याचा प्रयत्न महापालिका करेल. तसेच ज्या कामगारांनी कोरोनाकाळात काम केले आहे त्यांना भत्ता देण्याबाबत विचार केला जाईल. पण ज्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात आणि कोरोनासंबंधी इतर काम केली आहेत त्यांना त्वरित भत्ता देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही वेतन वाढ करताना पालिकेवर आर्थिक भार पडणार असल्याने आवश्यकता भासल्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत यातून मार्ग काढला जाईल, असे खा.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मनपावर पडणारा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होईल व या कंत्राटी कामगारांना देखील सन्मानजनक वेतन वाढ मिळेल. त्यामुळे लवकरच येत्या कालावधीत महापालिका कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai