भिंती नव्याने रंगणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 568
नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ च्या अनुषंगाने सुशोभिकरण कामे करताना मागील वर्षी काढलेली व अजूनही चांगल्या स्थितीत असलेली भिंतीचित्रे पाण्याने स्वच्छ करुन दर्शनी ठिकाणी नवीन चित्रे काढावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची छायाचित्रे अवलोकन करीत आयुक्तांनी या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. नव्याने काढावयाच्या भिंतीचित्रांमध्ये नवनवीन नजरेत भरतील अशा आकर्षक चित्र संकल्पना साकाराव्यात अशाही सूचना त्यांनी केल्या. मागील वर्षी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विदयार्थ्यांनी अभिनव चित्र संकल्पना राबविल्यामुळे शहराचे रुपच बदलून गेल्याचे नागरिकांना जाणवले व तसे अभिप्राय सर्व स्तरांतून व्यक्तही करण्यात आले याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी केला. यावर्षीही नव्या संकल्पनांसह जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विदयार्थ्यांप्रमाणेच इतरही कला महाविदयालयांच्या विदयार्थ्यांना या कामात सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. भिंतीचित्रांमधून ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखीत व्हावी याचे प्रभावी सादरीकरण करण्यात यावे, तसेच भिंतीचित्रांप्रमाणे मुख्य चौक, कॉर्नर, दुभाजक अशा दर्शनी ठिकाणी आकर्षक शिल्पाकृती उभाराव्यात व त्यातही ‘थ्री आर’ संकल्पनेनुसार टाकाऊपासून टिकाऊ शिल्पाकृतींचा अंतर्भाव असावा असे आयुक्तांनी सूचित केले.
शहरातील सर्व भागात प्रमुख ठिकाणी विविध प्रकारची कारंजी बसविण्यात यावी असे सूचित करतानाच ती कारंजी नियमीत सुरू राहतील याची काटेकोर काळजी घेण्याचेही निर्देशित करण्यात आले. विशेषत्वाने सायन पनवेल महामार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहतूक होत असून त्याठिकाणची सुशोभिकरण कामे अधिक कल्पकतेने करावीत तसेच प्रवाशांना आपण नवी मुंबई शहरातून प्रवास करत आहोत असा फरक जाणवावा अशा प्रकारे कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. अशाच प्रकारे रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूच्या दर्शनी भिंती चित्रांकित करुन सुशोभित कराव्यात असेही निर्देशित करण्यात आले. उच्चस्तरीय व भूमीगत जलकुंभाच्याही सुशोभिकरणाविषयी आयुक्तांनी सूचना केल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai