सानपाडामध्ये शिवजयंती दिमाखात साजरी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2022
- 746
नवी मुंबई ः शिवसेना शाखा सानपाडा प्रणित, शिवबा मित्र मंडळ व सानपाडा युवा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची 399 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. दिवंगत शिवसेना शाखाप्रमुख चिंतामण गणपत वास्कर यांच्या माध्यमातुन सुरु करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवाचे यंदाचे 40 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंतीचे औचित्य साधुन शिवसेना शाखा सानपाडा यांच्यातर्फे दरवर्षी उपक्रम राबवून हा उत्सव थाटात साजरा केला जातो. नागरिकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने गेली 40 वर्ष हा उत्सव मोठ्या जोषात पार पडत आहे. यावर्षी रक्तदान शिबिर, सत्यनारायण महापुजा, कोव्हिड योद्धा व ज्येष्ठांचा सन्मान, क्रिडापट्टूंचा सत्कार असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 52 शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदवला, शिवप्रतिमा पुजन, सत्यनारायण महापुजा तर हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार कला सर्कल व सरगम बँड हयांच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या वाद्य वादनावर सर्व शिवभक्तांनी नृत्याचा ठेका घेतला. सानपाडा विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, हिवताप निर्मुलन कर्मचारी, स्मशान भुमी कर्मचारी, मनपा व मनपा शाळा शिक्षक व कर्मचारी, खाजगी रुग्णालय कर्मचारी, बेस्ट कामगार, गैस वितरण कर्मचारी, एमएसईबी आशा वर्कर आणि स्वर्गीय मालतीबाई सोपान ठाकुर नागरी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी हयांचा कोविड योद्धा म्हणुन शाळ-श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच शिवसेना शाखेच्या माध्यमातुन कोविड -19 काळात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर, शाखाप्रमुख कु. रणधीर सुर्वे, युवासेना प्रल्हाद गायकवाड, जयेश दळवी, जयदिप पाटिल यांचाहि कोविड योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.
शेकडो ज्येेष्ठ नागरीकांनी शिवजयंती महोत्सवात उपस्थिती दर्शविली. सुमारे किमान 200 हुन अधिक जेष्ठ नागरिकांना सन्मानित केले. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व लढ्यात हिरहिरीने सहभाग नोंदवणारे सानपाडा ग्रामस्तप्रल्हाद मोरेश्वर ठाकुर हयांना सानपाड़ा रत्न पुरस्काराने गौरवणयात आले. तर क्रीड़ा क्षेत्रात सानपाड़ा विभागाचे नाव लौकिक वाढवणारे कु. नील शेकटकर (जलतरण), कु. ओमकर सागवेकर (लंगडी), कु. साई संदीप घागरे ( कुस्ती), श्रीनिवास गुप्ता (अथलेटिक), मोहन सर (जलतरण) हयांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवजयंती सोहळ्यास शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विट्ठल मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, मा. नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर, मा. नगरसेवक दिलीप बोराडे, उपजिल्हासंघटक डॉ. आशालता गोंधले, उपशहरसंघटक वंदना गोडसे, विभागप्रमुख महेश बनकर, विभागसंघटक माधुरी बनकर, वैशाली भोर, उपविभागप्रमुख गणेश पावगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai