खाद्यतेलाचे दर उतरणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 24, 2022
- 657
मुंबई ः महागाई गगनाला भिडली आहे; मात्र येणार्या काळात महागाईपासून सामान्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. सध्या खाद्यतेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत; परंतु आता खाद्य तेलाचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पाम ऑईलचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर निर्बंध घातल्याने भारतात तेलाचे दर वाढले होते; मात्र आता इंडोनेशियाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतात तेलाची आवक वाढून दर स्वस्त होऊ शकतात.
इंडोनेशियाकडून पाम तेलावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेल निर्यातीला सुरुवात होणार आहे. इंडोनेशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात करतो. भारत दर वर्षी तब्बल 80 लाख टन पाम ऑईलची आयात करतो. भारतामध्ये एकूण तेल वापरापैकी 40 टक्के हिस्सा हा एकट्या पाम तेलाचा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून तेलाची आयात सुरू झाल्यास भारतात तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना इंडोनेशियाच्या वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकार्याने सांगितलं की, महागाईला लगाम घालण्यासाठी आम्ही तेल निर्यातीवर बंदी घातली होती; मात्र सध्या आमच्याकडे पाम तेलाचं एवढं उत्पादन झालं आहे की अतिरिक्त तेल साठवण्यासाठी आमच्याकडे कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. आणखी तेलाचा साठा साठवू शकत नसल्याने इंडोनेशियन सरकारने तेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 28 एप्रिल रोजी इंडोनेशियाकडून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे.
भारतात तेलाचे दर वाढण्यामागील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध. रशिया आणि युक्रेनमधून भारत मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाच्या तेलाची आयात करतो; मात्र या दोन देशात युद्ध सुरू असल्यामुळे तिकडून होणार्या तेलाची आयात ठप्प आहे. त्यामुळे देशात आधीच तेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात भरीस भर म्हणजे इंडोनेशियाकडूनदेखील पाम तेलाची निर्यात बंद करण्यात आली होती. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर वाढले होते; मात्र आता निर्यात पुन्हा सुरू होत असल्याने तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai