कोपरा पुलाखालील वाहतूक बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2022
- 655
पनवेल : खारघर वसाहत आणि कोपरा गावाला जोडणार्या उड्डाण पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलाखालून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. या नो एन्ट्रीमुळे वाहतूक कोंडी टळणार असली तरी कोपरा ग्रामस्थांना खारघर वसाहतीमधून गावात येण्यासाठी खारघर हिरानंदानी चौकातून आणि कळंबोली रोडपाली येथील उड्डाणपुलाखालून वळसा मारून जावे लागणार आहे.
कोपरा गाव हे खारघर वसाहतीच्या मध्यभागी आहे. गाव आणि वसाहतीच्या पोटातून मधोमध शीव पनवेल महामार्ग जातो. वसाहतीमधील सेक्टर 3 ते 40 हा परिसर शीव पनवेल महामार्गाच्या एका बाजूला तर सेक्टर 1 ते 10 हा परिसर दुसर्या बाजूला आहे. वसाहतींच्या या दोन्ही परिसरात जाण्यासाठी अधिकृत हिरानंदानी चौक, कोपरा पूल आणि बेलपाडा पूल असे तीन पर्याय प्रवाशांसाठी आहेत. मात्र अनेक वर्षांपासून सायंकाळी व सकाळच्या वेळेला कामावर जाणार्यांच्या घाईमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कोपरा उड्डाणपुलाखाली होताना दिसते. दररोजच्या त्रासाला वैतागून खारघर सेक्टर 11 येथून महामार्ग ओलांडून सेक्टर 10 मध्ये येणार्या वाहनांवर निर्बंध लावल्यास हा प्रश्न सुटेल यावर वाहतूक पोलिसांचे एकमत झाले आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 21 जूनपर्यंत हरकती मागविल्यानंतर ही अधिसूचना काढली. याबाबत कायदेशीर कार्यवाही झाली असून ही अंमलबजावणी झाल्यास कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. परंतु याच वळसा मार्गामुळे कोपरा गावातील वाहनचालकाला खारघरच्या डीमार्ट दुकानातून घरी येण्यासाठी कळंबोली रोडपाली येथील उडडाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai