सीबीएसई दहावी 94.40% तर बारावीचा 92.71% निकाल
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 22, 2022
- 756
मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई बारावी व दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा करत होते. अखेर शुक्रवारी हे दोन्ही निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये सीबीएसई बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 92.71 टक्के असून महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के लागला आहे. तर दहावीच्या निकालात एकूण 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी सीबीएसईने दोन टर्ममध्ये परीक्षा घेतल्या. अंतिम निकालासाठी, लेखी पेपर्सच्या बाबतीत, टर्म 1 ला 30% आणि टर्म 2 ला 70% महत्त्व देण्यात आले आहे. प्रॅक्टिकलमध्ये, दोन्ही टर्म्सना समान महत्त्व देण्यात आले आहे. सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यात दहावीतील 19 लाख 76 हजार 668 विद्यार्थी पास झाले. मुलींनी यात चांगली कामगिरी केली आहे.
दोन टर्ममध्ये परीक्षा
- यावर्षी कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या आहेत. दुसर्या टर्मची परीक्षा ही एप्रिल -मे महिन्यात घेण्यात आली.
- त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यंदाच्या वर्षी उशिराने जाहीर झाला.
- बारावी परीक्षेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणार्या विद्यार्थी संख्या 134797 (9.39टक्के) आहे. 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी संख्या 33432 (2.33 टक्के) इतकी आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai