खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


‘ब’ जीवनसत्वाची कमतरता देतेय अनेक आजारांना निमंत्रण

आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची निर्मिती फारच नगण्य प्रमाणात होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नातून जीवनसत्त्वं घ्यावी लागतात. निरोगी राहण्यासाठी माणसाला विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वं आपल्या शरीरात वेगवेगळी कार्यं करतात. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. 

बी 12 मेंदुच्या विकासासाठी महत्वाचे
शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे हे शोधणं अनेकदा कठीण असतं. व्हिटॅमिन बी 12 देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचं समजलं जातं. हे जीवनसत्त्व केवळ लाल रक्तपेशी आणि डीएनएच्या निर्मितीसाठीच आवश्यक नाही तर मेंदू आणि चेतापेशींच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावतं.
कमतरतेमुळे उद्भवणार्‍या समस्या
व्हिटॅमिन बी 12 मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतं. शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित समस्या, वंध्यत्व, थकवा, स्नायू कमकुवत होणं आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्याची लक्षणंही जिभेवर दिसू लागतात. 
जिभेच्या अल्सरचा धोका
वेबमेड या हेल्थ वेबसाईटनुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लोकांना जिभेच्या अल्सरच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत जिभेवर किंवा हिरड्यांमध्ये अल्सर होऊ शकतो. जिभेवर तयार झालेले व्रण सामान्यतः आपोआप बरे होतात; परंतु वेदना आणि जळजळ टाळायची असेल तर आंबट आणि अधिक तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
जीभ गुळगुळीत होते
वेबमेडनुसार, जिभेवर फोड निर्माण होण्यासोबतच जीभ फारत गुळगुळीत होणं हेदेखील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण आहे. जिभेवर असलेल्या लहान दाण्यांना पॅपिला म्हणतात; परंतु शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, हे दाणे पूर्णपणे गायब होतात आणि जीभ अगदी गुळगुळीत होते; परंतु जीभ गुळगुळीत होण्याचं कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता एवढंच नाही तर काही वेळा संसर्ग आणि औषधांमुळेही जीभ गुळगुळीत होऊ शकते. 
इतर लक्षणे
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची इतरही अनेक लक्षणं आहेत. शरीरात उर्जेची कमतरता, स्नायू कमकुवत होणं, अंधुक दिसणं, नैराश्य आणि गोंधळ यासारख्या मानसिक समस्या, स्मरणशक्ती कमकुवत होणं तसंच काही गोष्टी समजण्यात अडचण येणं, शरीरात मुंग्या येणं अशी लक्षणं दिसतात. 
‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (एनएचएस) नुसार, 19 ते 64 वयोगटातल्या लोकांना दररोज 1.5 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. मांस, मासे, दूध, चीज, अंडी, तृणधान्यं याशिवाय, व्हिटॅमिन बी 12 चे अनेक सप्लिमेंट्स बाजारात उपलब्ध आहेत.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट