जनतेचा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पाठिंबा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 491
‘आमदार आपल्या दारी’मध्ये शेकडो अर्ज प्राप्त
नवी मुंबई : बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक प्रभागात राबवण्यात येत आहे. नेरूळ येथे सिडकोने दिलेल्या भूखंडावरच सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय झाले पाहिजे, याकरिता आता नवी मुंबईतील जनता आग्रही झाली आहे. रुग्णालयाच्या आड येणार्या नेते आणि भूखंडाचे पैसे भरण्यात दिरंगाई करणार्या महापालिका प्रशासनाविरोधात नवी मुंबईतील नागरिकांमधून तीव्र शब्दांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. बेलापूर येथे या उपक्रमादरम्यान रुग्णालयाला पाठिंबा देणारे शेकडो अर्ज म्हात्रे यांना प्राप्त झाले.
आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईत पहिल्यांदाच सर्वसामान्यांच्या हक्काचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. परंतु, या रुग्णालयासाठी सिडकोने दिलेल्या भूखंडाच्या बदल्यात महापालिकेला पैसे भरावे लागणार आहेत. या मुद्द्यावरुन काही लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे दिशाभूल करणार्या मागण्या करून अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींच्या अवाजवी मागण्यांमुळे अद्याप महापालिकेतर्फे भूखंड खरेदीची प्रक्रिया जाणीवपूर्वक संथगतीने हाताळली जात आहे. महापालिकेतर्फे भूखंड खरेदीला होणारी दिरंगाई आणि राजकीय नेते मंडळींकडून होणारी दिशाभूल यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदा म्हात्रे यांच्या ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिक त्यांची भेट घेत असून शहराला या रुग्णालयाची किती गरज आहे, याबाबतच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या रुग्णालयाच्या आड येणारे राजकीय नेते हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखाच्या आड येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशा नेत्यांनी विरोध करणे आणि महापालिकेने भूखंडाचे पैसे न भरल्यास लवकरच त्यांच्याविरोधात जनआंदोलन उभे राहील, असे पत्र म्हात्रे यांना प्राप्त होत आहेत.
- उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
बेलापूर गाव तलावाजवळ गणेश मंदिर येथे आयोजित या उपक्रमातून मंदा म्हात्रे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती, एमएसईबी कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, शिधावाटप निरीक्षक शीतल लाडके, पोलिस निरीक्षक मंगेश बोचकर उपस्थित होते. सीबीडी बेलापूर येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे; तसेच बेलापूर ग्रामस्थांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात यावे, असे दोन ठराव बेलापूर ग्रामस्थांकडून मांडण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai