पनवेलमध्ये भरणार योजनांचा महामेळावा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 586
पनवेल ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे बाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश- 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल जयराज वडणे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
जयराज वडणे यावेळी म्हणाले की,नागरिकांना लाभदायी ठरणार्या 18 योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून, 31 ऑक्टोबर पासून हे अभियान सुरू झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता होत असून यावेळी प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश,अलिबाग येथून सावंत मॅडम, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले. तर यावेळी मनोज भुजबळ यांनी विधी सेवा समिती, पनवेल करत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माध्यमांना अवगत केले.
पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या 25 प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील. - जयराज वडणे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai